मानसिंगवाडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय…! संतोष गुट्टे च्या मेहनतीने केले आई वडीलांच्या कष्टाचे चीज.

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

मानसिंगवाडी तालुका कंधार येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजीराव गुट्टे यांचे चिरंजीव संतोष शिवाजीराव गुट्टे वय २३ वर्ष यांनी आई वडीलांच्या दैनंदिन काबाडकष्ट आणि मेहनतीचे जवळून अनुभव घेत जिद्द आणि चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर अपार मेहनत घेऊन नुकते पीएसआय (फौजदार) पदावर नियुक्ती मिळवली आहे त्यामुळे संतोष गुट्टे च्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संतोष गुट्टे चे वडील हे अल्पभूधारक शेतकरी , घरची तीन एकरच शेती असतानाही काबाडकष्ट करून आणि मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले. ५० घराचं छोटंसं गाव असलेली मानसिंगवाडी हे गाव उथळ माळराणाच्या टेकड्यांवर वसलेले , जेथे ना रस्ता ना मूलभूत सुविधा. त्यातच संतोष गुट्टे च पत्रे आणि कुड

घेतलेलं घर , घरची परिस्थिती हालाकीची या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी संतोष ने कसली होती कंबर.

गावात पहिली ते चौथी पर्यंतचीच जि प ची शाळा याच शाळेत संतोष गुट्टे चे झाले प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे आंबूलगा येथील माणिकप्रभु या शाळेतून झाले. तर अकरा वी , 12 वी ही तालुक्याच्या ठिकाणी व B.A. History कंधार येथिल श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे झाल्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज मधून मेकॅनिकल ब्रँच मधून शिक्षण पूर्ण झाले आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संतोष ने पुणे शहर गाठले.

२०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या पीएसआय च्या जाहिराती नुसार फॉर्म भरला आणि परीक्षा दिली , त्यानुसार काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या निकालात संतोष गुट्टे ने २५० मार्क मिळवत ९२ वा रँक पटकावला.

संतोष गुट्टे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की , माझ्या या यशात माझे आई वडील , गुरुजन आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सर्व हितचिंतक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलून दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *