शिक्षणतज्ञ ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले ह्या स्त्रीमुक्ती लढ्याच्या आद्यप्रणेत्या आहेत.त्यांनी जाचक रुढींवर हल्ला चढवत मानवता हाच खरा धर्म आहे ही भावना महाराष्ट्राच्या भुमित रुजवली.प्रत्येक स्त्रीला ज्ञानअमृताचा कलश बहाल केला.

त्यांचा जन्म ३जानेवारी १८३१रोजी नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई या दांपत्याच्या पोटी झाला.नेवसे पाटिल घराण्यातील सावित्रीमाई हे पहिले अपत्य…अत्यंत निर्भिड आणि कुशाग्रबूध्दीमत्ता लाभलेल्या सावित्रीमाईंचा विवाह १८४०रोजी सत्यशोधक ज्योतिराव फुले यांच्यांशी झाला.त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होती.वयाच्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह १२ वर्षाच्या ज्योतीरावांशी झाला.स्त्रीशिक्षणाच्या कल्पनेने झपाटलेल्या ज्योतिबांनी समाजाची तमा न बाळगता सावित्रीला साक्षर केले.

सावित्रीमाईनेही स्त्रीशिक्षणाचे व्रतच घेतले.शेतातल्या मातीवर अक्षर गिरवत असंख्य संकटांचा सामना करत त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या.१जानेवारी१८४८साली”भिडेवाड्यात”ज्योतीबा आणि सावित्रीने मूलिंसाठी पहिली शाळा सुरु केली.ही शाळा म्हणजे भारतातील मूलीकरीता सूरु केलेले पहिले महाविद्यालय ठरले.महाराष्ट्रातील पुणे शहर फारच पुराणमतवादी विचाराचे होते.त्या भूमीवर सावित्रीमाईंनी स्त्रियांच्या उध्दारासाठी रणशिंग पुकारले.

त्या शाळेत एकूण ९मूलींनी प्रवेश घेतला.सावित्रीमाई या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापीका आणि शिक्षिका देखिल झाल्या.स्त्रीशाक्षणाशिवाय स्त्रीजातीचा उध्दार होऊच शकत नाही याची जाणीव त्यांना होती.म्हणूनच शेण,माती,दगडांचा मारा सहन करत त्या मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडत.ज्योतीराव करत असलेल्या समाजसुधारणेच्या लोकशिक्षणाच्या कार्यात ज्योतिरावांच्या मदतीने त्यांनी स्वता:चे व्यक्तीमत्व निर्माण केले.१जानेवारी १८४८पासून १५मार्च १८५२पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरीता त्यांनी चारवर्षात१८शाळा सुरु केल्या.

महिलांना शिक्षितकरण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सावित्रीमाई फूले यांना १६नोव्हेंबर १८५२ला ब्रिटिश शासनाने त्यांचा गौरव केला.शाळासुरु केल्यानंतर सूरुवातीला फक्त ६मूलीच होत्या.नंतर ही संख्या वाढली.स्त्रीयांमध्ये शिक्षणाची जागृती निर्माण झाली.सनातत्यांनी मात्र स्त्रीशिक्षणाला कडाडून विरोध केला,सावित्रीमाईंना खुप त्रास दिला,मूली शिकल्या तर जग बूडेल अशी या कर्मठ लोकांची धारणा होती.आणि स्त्रीयांनी शिक्षण घेणे त्यांच्या दृष्टीने पाप होते.


त्या एक प्रतिभासंपन्न कवियत्री होत्या.”काव्यफुले”हा सावित्रीमाईचा पहिला कवितासंग्रह!या कविता संग्रहात त्यांनी निसर्गाविषयी,सामाजिक,प्रार्थनापर अशा अनमोल कवितांचा ठेवा आपल्याला दिला आहे.कुशाग्र बूध्दिमत्ता,अलौकिक प्रतिभाशक्तीचा वरदहस्त त्यांच्यावर होता.आणि याचा उपयोग त्यांनी स्त्रीयांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी केला.सावित्रीमाईचे सामाजिक कार्य ,शैक्षणिक कार्य हे ऊच्च कोटीचे आहे.त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी सुरुवात केलेली चळवळ समस्त स्त्रीवर्गाचा उध्दार करुन गेली.

लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समता,बंधुता,मानवता व व्यक्तीस्वातंत्र्य ही मूल्ये समाजमनात खोलवर रुजवली.दुर्बलांना सबल करुन त्यांना समानहक्क बहाल केले.तसेच सत्यशोधक परिषदांना मार्गदर्शन केले.मनुस्मृती,खुळचळ परंपरा यांचा त्यांनी धिक्कार केला,यामूळे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील झाला.धर्मबूडवी म्हणून त्यांच्यावर अनेक आरोप झाले.पण त्या डगमगल्या नाहीत समाजव्यस्थेवर त्या शेवट पर्यंत प्रहार करत राहिल्या.आपले संपूर्ण आयूष्य त्यांनी समाजासाठी चंदनाप्रमाणे झिजवून स्त्रीजीवन सुखकर केले.

एकोणीसाव्या शतकातील सावित्रीमाई ह्या सर्वांत प्रेरणादायी व्यक्तीमत्व होत्या आज त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात “महिला शिक्षण दिवस” म्हणून साजरा केला जाणार आहे.खरे पाहाता सावित्रीमाई यांचे कार्य अद्यापही पूर्ण झाले नाही,त्यांचे कार्य पूर्ण करण्याचा संकल्प करुन समाजातील ज्या मूली शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणप्रवाहात आणूया.महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलींसाठी शिक्षणाच्या विविध योजना राबविल्या आहेत त्याचा फायदा घेत विकास साधता येईल.सावित्रीमाई फुलेच्या योगदानामूळेच बहुजनांचे,मुलींचे जीवन फुलले…खरे,तर सावित्रीमाईंच्या कार्याचा वसा तरुणाईनने पूढे चालवायला हवा.प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्निच्या माघे खंबीरपणे उभे राहायला हवे.स्त्रीयांना समानतेची वागणून देउन सामाजीक हक्काबाबत जागरुक करायला हवे.


समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणा-या पहिल्या शिक्षिका,ऊत्कृष्ठ लेखिका,कवियत्री,अनाथांची माता,दिनदुबळ्यांची कैवारी समाजातील स्त्रीदास्यत्व मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.इ.स.१८९६ते९७साली पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला.प्लेगरुग्णांना त्या आधारदेत त्यांची सेवाकरु लागल्या.प्लेगच्या रुग्णांची सेवा करतांना सावित्रीमाईंना पण प्लेग झाला,यातूनच १०मार्च१८९७रोजी त्यांचे निधन झाले.अज्ञान व जातीभेदावर प्रहार करणा-या आधूनिक विचारसरणीच्या शूरमर्दानी लढव्वयाबाण्याला जयंतीनिम्मित कोटी कोटी प्रणाम…!

rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *