खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने जिल्हातील पत्रकारांचा सत्कार.

सकारात्मक पत्रकारीता काळाची गरज – डॉ. खा. विनयजी सहस्त्रबुद्धे

कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार …

नांदेड ; प्रतिनिधी

कोरोणामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील .आजच्या पत्रकारासमोरील आव्हाने बदलली असून सकारात्मक पत्रकारीता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड येथे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष तथा डॉ. खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी जिल्हा नांदेड आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने नांदेड येथिल आनंद सागर फक्शन हॉल येथे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.9 जानेवारी रोजी जिल्हातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मध्यम तज्ञ डॉ. समिरण वाळवेकर, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, आ. राम पाटील रातोळीकर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, माजी आ. अविनाश घाटे,चित्ररेखा गोरे ,प्रविण पाटील चिखलीकर आदीची यावेळी व्यासपिठावर उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बदलती आव्हान पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज राहण्याची गरज आहे. चांगला बदल सगळ्यांसाठी महत्वाचा असतो. खरे तर कामगार कपातीमुळे रोजगार बुडाला म्हणून हताश होण्याची गरज नाही.

तर पत्रकारिता प्रगल्भ करण्याची गरज आहे. रचनात्मक पत्रकारिता काळाची गरज आहे. जो बदल होत आहे तो समजापुढे आला पाहिजे. बातमीच्या जुन्या व्याख्यात न आडकता सकारात्मकता असणारी बातमी लोकांपुढे आली पाहिजे. निराशाजनक पत्रकारिता कमी होणे आवश्यक आहे.लोकहिताच्या बातम्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

चवीने वाचणाऱ्या बातम्या जरूर लिहाव्यात पण सकारात्मक बातम्यांना अधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे.लोकांची अभिरुची विकसित झाली आहे. त्यामुळे यामुषांगणे विचार करण्याची गरज आहे.

वृत्त आणि विचार यात भेसळ झाली आहे. त्यामुळे अग्रलेखातून आपले विचार व्यक्त व्हावेत. पण बातमीत विचार येणे ही बाब घातक आहे. एका बदल समाज दुसर्याबदल कळप, झुंड हे चुकीचे आहे. बातम्या राजकीय भूमिकेशी नसाव्यात तर त्या वस्तीनिष्ट असाव्यात. बातम्या निष्पक्ष असायला हवे. बातम्यांची विश्वसनीयता कमी होत चालली आहे ही बाब चिंता जनक आहे.त्यामुळे काळानुसार बदल करण्याची गरज आहे असेही डॉ. खा. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले.

यावेळी मध्यम तज्ञ डॉ. समिरण वाळवेकर यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारा समोरील आवाहने व वास्तव यावर रोखठोक विचार मांडताना आजच्या पत्रकारांनी अपडेट बनावे केवळ पत्रकारीतेवरच आवलंबून न राहता सोशल मिडीयाचा वापर करुन त्यावार स्वार होण्याचा सल्ला दिला.

प्रस्ताविक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले.पत्रकार सन्मान सोहळ्यास

यावेळी कृष्णा शेवडीकर,संजीव कुलकर्णी ,रामेश्वर बदर,शंतनू डोईफोडे,नागोराव बेंद्रीकर,अनिकेत कुलकर्णी ,पंढरीनाथ बोकारे,महमंद ताहेर,कालीदास जहागीरदार ,कमलाकर जोशी यांच्या सह नांदेड जिल्ह्यात पत्रकार बहु संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *