नराधमांना जनतेच्या ताब्यात द्या!

नांदेड जिल्ह्यात चिड आणणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. भोकर तालुक्यातील दिवशी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी आरोपी बाबू संगेवार याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बाबू हा सालगडी म्हणून गावात काम करत होता. शेतमालकाच्या मुलीवरच त्याने बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. या अमानुष घटनेमुळे भोकर तालुक्यासह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील एक शेत मालक त्यांची पाच वर्षीय मुलगी दुपारी घरी नसल्याचे पाहून शोधा शोध केली. त्यांनतर त्यांचा सालगडी बाबू खंडू सांगेराव याने त्या चिमुकलीला पळून नेला असल्याचा संशय आल्यावरून भोकर पोलिसात ही माहिती दिली. त्या दोघांचा शोध घेत असताना दुपारी २ च्या दरम्यान त्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तेलंगाणा सीमेजवळ सुधानदी पात्रात मिळून आला. यावेळी तिच्यावर पाशवी बलात्कार करून निर्घृण खून केल्याचे निदर्शनास आल्यावरून ही माहिती भोकर पोलिसांना कळविण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांचा ताफा तात्काळ घटनास्थळी पोहचला व आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी नदी पात्रात पाण्यात लपून बसल्याचे दिसले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत असताना संतापलेल्या जमावाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

२०२० मध्ये देशभरातील सत्र न्यायालयांनी ७७ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. यापैकी तब्बल ४६ जणांना लैंगिक अत्याचार करून खून केल्याबद्दल, तर चार जणांना अल्पवयीन बालकांवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली दरवर्षी मृत्युदंडाच्या शिक्षेसंबंधीचा अभ्यास करून प्रकल्प ३९अ या नावाने प्रसिद्ध करते. त्यांनी २०२०चा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

२०१९च्या १०३ जणांच्या फाशीच्या शिक्षेच्या तुलनेत गतवर्षी कमी लोकांना ही शिक्षा दिली असली तरी याचे मुख्य कारण कोरोना महामारीचा न्यायालयीन कामकाजावर झालेला परिणाम हादेखील आहे. लॉकडाऊन लागण्यापूर्वी पहिल्या तिमाहीत ४८ जणांना फाशी सुनावण्यात आली होती. राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड उच्च न्यायालयांनी प्रत्येकी एक अशा तीन जणांची फाशीची शिक्षा २०२०मध्ये कायम केली. तर सर्व उच्च न्याायलयांनी २२ जणांची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेप दिली. पाच जणांना दोषमुक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने चार गुन्ह्यांतील सहा जणांची फाशी कायम केली, तर तीन गुन्ह्यांतील चार जणांची शिक्षा कमी करून जन्मठेप दिली. दि. ३० जानेवारी २०१६ रोजी अपहरण करून खून केलेल्या दोन आरोपींना नागपूर सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने २५ वर्षे कैदेत बदलली. यवतमाळ सत्र न्यायालयाने २०१५ मध्ये बलात्कार व पोक्सोअंतर्गत शत्रुघ्न मेश्राम याला दिलेली फाशी कमी करून २५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली

दिवशी बु. येथे झालेल्या पाच वर्षीय बालिकेच्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी २२ रोजी भोकर बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाने दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव येथील अभिवक्ता संघाने घेतला.

तालुक्यातील दिवशी बु. येथे २० रोजी पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडल्यानंतर विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. सदरील घटनेतील आरोपीस पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. घटनेची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी व आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, या मागणीसाठी दिवशी बु. येथील ग्रामस्थांनी २२ रोजी भोकर बंदचे आवाहन केले होते. त्या आवाहनास भाजप महिला आघाडी, मुन्नेरवारलू समाज संघटना, ऑल इंडिया पॅँथर सेना आदींसह विविध सामाजिक संघटनांनी घोषणाबाजी करीत शहरातील प्रमुख रस्त्याने वेगवेगळी रॅली काढली होती. बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी व लहानसहान विक्रेत्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे शहरातील सर्व प्रतिष्ठाने बंद होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.

सदरील घटनेचा भोकर अभिवक्ता संघाने निषेध करून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव घेतला. तसेच घटनेच्या निषेधार्थ भोकर बंदच्या आवाहनामुळे २२ रोजी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही.

मौजे दिवशी बु. येथिल आदिवासी मन्नेरवारलू समाजातील एका पाच वर्षीय निष्पाप बालिकेवर बलात्कार करुन निर्घुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. आरोपीस फासावर लटकवण्यात यावे. अशी मागणी आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने करण्यात आली.

सगरोळीत आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली तर हिमायतनगर येथील अखिल भारतीय आदिवासी मुन्नेरवारलु समाजाच्यावतीने जाहीर निषेध करुन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. बिलोलीत भाजप महिला आघाडी व मनेरवारलु समाजाच्या वतीने तहसिलदार कैलाश वाघमारे यांना कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. कुंडलवाडीतही मन्नेरवारलु समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

दिनांक २० जाने.२०२१ रोजी एका पाच वर्षीय निष्पाप निरागस चिमुकलीवर पार्शवी अत्याचार करून निर्घृण खून करून समस्त मानवतेला काळीबा फासणाऱ्या नारधामास जलदगती न्यायालयात खटला चालून तत्काळ निर्णय देवून कठोर (मरेस्तोर. ) फाशीची शिक्षा देऊन पीडित मयत बालिकेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावे अन्यथा अखिल भारतीय ओ बी सी महासंघा तर्फे संपूर्ण राज्यभर जनाआंदोलन पुकरन्यात येईल असा इशारा जिल्हा पोलिसद्यक्ष मा पामोद शेवाळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे, मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा ग्रहमंत्र अनिलजी देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आले आहे.

सदरील प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमास तात्काळ नवीन दिशा कायद्यानुसार २१ दिवसात फाशीची शिक्षा देऊन पिडीत चिमुकली व तिच्या कुटूंबियास न्याय द्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी केले राज्याच्या गृह मंत्र्यांकडे मागणी, ही घटना अत्यंत दुर्दैवी व अमानवी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अन्याय अत्याचार होत आहे, ही खेदाचीत बाब आहे. त्यामुळे देशात व राज्यात महीला मध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, जोपर्यंत अशा नराधमास फासावर लटकवून फाशी दिली जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत यासाठी अस्या नराधमास तात्काळ नवीन नवीन दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फासावर लटकवून फाशी दिली पाहिजे.

सबंध मानव जातीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करत जिंतूर येथील रमाई महिला विचार मंच तर्फे स्थानिक तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना निवेदन देऊन बलात्कारी आरोपीस तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.
रमाई विचार मंचच्या अध्यक्षा सौ.आशाताई संभाजी खिल्लारे यांनी असे सांगितले की राज्यातील महिला, अबला मुली सुरक्षित नसून विशेषतः दलित, आदिवासी महिला व मुलींना त्यांचे बलात्कार करून खून केले जात आहे. असे प्रकार लवकरात लवकर थांबले पाहिजे व नुकत्याच फुले शाहू आबडेकरी विचारांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी (बु) येथील आदीवासी मनेरवारलु जमातीच्या 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या त्या नराधमास फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून शासनाने त्या आरोपीस लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

विविध संघटनांनी या प्रकरणी आंदोलन पुकारले आहे. मोर्चे निघत आहेत. बंद पुकारला जात आहे. निषेध नोंदवला जात आहे. एवढेच नव्हे तर भोकर तालुक्यातील या अमानवी कृत्याची बातमी पसरताच सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. आरोपीला कठोर शिक्षा (फाशी) व्हावी अथवा आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२६.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *