कंधार (प्रतिनिधी)
तालुक्यातील तळ्याची वाडी, ठाकू तांडा, रामा तांडा, गणा तांडा, पाणशेवडी या भागात रविवारी अचानक आग लागून या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, या भागातील आगीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी नायब तहसीलदार विजय चव्हाण, पानशेवडी चे सरपंच कोंडीबा मोरे ,संगमवाडी चे सरपंच प्रभाकर केंद्रे, व्यंकट गर्जे आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी आगीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महसूल प्रशासनाला केली व पानशेवडी व तळ्याची वाडी येथे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने या भागातील दोन ही तळ्याची पाहणी यावेळी आशाताई शिंदे यांनी करून या भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे कटिबद्ध असून लवकरच या भागातील पाण्याची समस्या मार्गी लावल्या जाईल असे आशाताई शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी दत्ता पाटील शिंदे, माधव घोरबांड, अशोक पाटील कळकेकर ,श्याम पाटील सावळे, योगेश नंदनवन कर, शेरू भाई, अजीम भाई, बंटी गादेकर, वसंत मंगनाळे सह या भागातील शेतकरी बांधव, तलाठी प्रशासकीय कर्मचारी सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.