पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी घेतली लस
कंधार ; विशेष प्रतिनिधी फुलवळ
कोरोना महामारीच्या काळात जनमाणसाला शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लस कोविशील्ड चे मोफत लसीकरण सर्वत्र सुरू झाले असून दि. ३१ मार्च रोज बुधवारी प्रा.आरोग्य उपकेंद्र फुलवळ येथेही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले.
लस देण्यापूर्वी प्रत्येकाची अँटीजन टेस्ट आवर्जून केली . यावेळी येथील समूह आरोग्य अधिकारी डॉ. मुश्ताख अहेमद शेख , आरोग्य सहाय्यक एस.एम.अली , आरोग्य कर्मचारी सुधाकर मोरे , आरोग्य सेविका जयश्री गुंडे , आशावर्कर मीना वाघमारे , शेवंता गोधणे , अर्धवेळ कर्मचारी रुखीयाबी शेख व बापूराव व्हर्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या वर्षभरापासून संबंध जगभरासोबतच भारत देशात कोरोना या विषाणूच्या महामारीने हाहाकार माजवला असून प्रत्येकाला जीवनाचे महत्व पटवून देत जगणे किती तारेवरची कसरत आहे हे केवळ एका विषाणूने तुम्हा , आम्हाला शिकवून दिले आहे. यातच सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र पुन्हा एकदा कोरोना विषाणू ने डोके वर काढले असून दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत असल्याचे आपणच दररोजच पाहतो , वाचतो आहोत . तरीपण म्हणावी तेवढी काळजी आणि शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्री चे काटेकोरपणे पालन करत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
यावर आवर घालण्यासाठी सरकार गेली वर्षभरापासून आटोकाट प्रयत्न करत असून वेळप्रसंगी नाविलाजने लॉकडाऊन सारखे हत्यारही वापरले , परंतु यावरून ही या आजाराला आळा बसत नाही आणि दिवसागणिक वाढते कोरोना बाधित रुग्ण आणि होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आता शासन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करणे सुरुवात केली आहे. आणि वेळोवेळी अनेक माध्यमातून जनजागृती चे काम जोरात चालू असून आता गावपातळीवर ही या प्रतिबंधात्मक लसीकरणा चे काम सुरू करण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेवडी अंतर्गत असलेल्या फुलवळ सह अन्य सात असे एकूण आठ आरोग्य उपकेंद्रावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे , पानशेवडी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. फरणाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधात्मक लस कोविशील्ड चे लसीकरण ला सुरू करण्यात आले असून आपण सर्वांनी कोविशील्ड चे लसीकरण तर करून घ्यावेच परंतु आपल्या कुटुंबातील , नात्यागोत्यातील सर्वांना आणि शेजाऱ्यांना ही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आरोग्य विभागाच्या वतीने कळवण्यात आले असून ज्यांनी ज्यांनी ही लस घेतली ते सुद्धा आपापला फोटो शोशल मीडियावर शेअर करत आपापलं मत मांडत जनजागृती करत आहेत.
आज दि.३१ मार्च रोजी पानशेवडी प्रा.आ.केंद्र अंतर्गत असलेल्या फुलवळ आ. उपकेंद्रावर एकाच दिवसात ७९ , पानशेवडी – ३० , पानभोसी – ०१ , पोखर्णी – १५ , शेकापूर – ५० , घोडज – ४९ , बहाद्दरपुरा – ५० आणि आंबूलगा – १० असे आठ उपकेंद्रावर एकूण २८४ लोकांनी कोविशील्ड लस घेतली.
फुलवळ येथे लसीकरण प्रारंभाच्या वेळी सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते , माजी सरपंच बालाजी देवकांबळे , ग्रा.पं. सदस्य प्रवीण मंगनाळे , पत्रकार मधुकर डांगे , माणिकराव मंगनाळे सह महिला , पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी फुलवळ येथिल दैनिक सकाळ चे पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी लस घेवून एक आदर्श निर्माण केला असून केवळ दुसऱ्यांना सांगितले आणि आपण मागे राहीले असे योग्य नाही .पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी स्वतः लस घेवून कृतीतून दाखवले आहे.ही लस सुरक्षित असून सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.युगसाक्षी परीवाराचे ते सदस्य आहेत याचा युगसाक्षी परीवाराला अभिमान आहे.