सामाजिक, राजकीय व बहुजन चळवळीतला एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कंधार शहरात परिचित असलेले आमचे मित्र राजु भाऊ केकाटे यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस चे कंधार शहराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. बहुजनांच्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला म्हणून चर्चा झाली तसा आनंद आम्हाला सुद्धा झाला.
हा अवलिया जसा पदभार स्वीकारला तसा वादळासारखं गोरगरिबांचे कामे करत फिरतोय..कंधार शहरातील महापुरुषांची जयंती असलकी तन मन धनाने सहभाग… मग ती जयंती छञपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतीबा फुले,अण्णा भाऊ साठे, महात्मा बसवेश्वर,अहिल्याबाई होळकर,संत सेवालाल महाराज, महाराणा प्रतापसिंह,अशा अनेक जयंतीत सक्रिय सहभाग आणि योगदान राहतेच .
हल्ली कोरोनाने जगासह देशात,राज्यात ,जिल्हात , कंधार तालुक्यात , शहरात धुमाकूळ घातला त्याचा थेट परीणाम देशासह कंधार शहरात लाॅकडाॅनचा काळात दिनदुबळ्या गोरगरिबांना सोसावा लागला. याची दखल व जवाबदारी स्विकारून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ,महाराष्ट्राते मुख्यमंत्री अजितदादा पवार ,खा.सुप्रिया सुळे ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,किसानभारतीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे ,ॲड विजय धोंडगे यांची प्रेरणा घेऊन तब्बल 76 दिवस योग्य नियोजन करुन शहराच्या प्रत्येक वॉर्डात गरजुवंत अपंग,विधवा,निराधार गोरगरिबांना धान्यांची किट देऊन दिनदुबळ्यांना हातभार लावण्याचे अमोल कार्य
तसेच रक्तदान शिबीर,डाँक्टर,नर्स,पत्रकार यांना फेस शिल्ड मास्क वाटप यासह कोवीड मध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणार्या महिला डॉक्टर,नर्स,पोलीस,सामाजिक कार्यकर्त्या यांना मर्दानी महाराष्ट्रची म्हणुन सन्मानपत्र देवुन त्यांचा गौरव या पामराकडून करण्यात आला आहे. # yugsakshilive.in
कोरोना विषाणु च्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे शासनाच्या वतीने खबरदारी चा उपाय म्हणून लॉक डाउन करण्यात आले.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कंधार येथील बेरोजगार गरजू कुटुंबाना उपासमारीची वेळ आली आहे.ही बाब लक्षात घेवुन कंधार तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या आदेशा नुसार अन्नधान्याचे किट वाटप .
लॉकडाऊन सुरु झाले तेव्हा पासून शहरात विविध भागात तसेच गल्ली वार्डात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतिने गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.शहराध्य राजकुमार केकाटे यांनी नियोजन करुन अन्न धान्य व भाजीपाला यांचे वाटप केले.
# yugsakshilive.in
पञकार बांधवासोबत सलोख्याचे संबंध,इत्तर पक्षातील आपुलकीचे नाते,सामाजिक चळवळीतील पदाधिकारी यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध राजकुमार केकाटे यांचे पाहण्यास आम्हास मिळते..
कंधार व लोहा तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधवानी राजकुमार केकाटे यांच्या कार्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. सुमारे दोन वर्षाच्या कालावधीत विविध कार्याला उजाळा दिला मोठी प्रसिद्धी दिली.कोरोना काळातही सुमारे ७६ दिवासात पेपरच्या माध्यमातुन राजकुमारे व त्यांची आई ,पत्नी व सर्व कुटूंबानी दीन ,दूबळ्या ,दिव्यांगाच्या तोंडात लॉकडाऊन काळात अन्न भरवण्याचे कार्य केले आहे.एवढेच नाही तर कोरोना काळात सर्वाचे घरे दारे ,कवाडे गोर गरींबाना बंद असणाऱ्या श्रीमंताचौया घरापेक्षा राजकुमार केकाटे यांचे घर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचा वसा चालवत आपले घर कोरोनाची भिति न बाळगता खुले होते.एवढेच नाही तर मान सन्मानाने घरोघरी जावून अन्नदान केकाटे कुटूंबानी केले आहे आणि कंधार ,लोहा तालुक्यातील पत्रकार बांधवानी त्यांना प्रसिद्धी पण दिली आहे.खरोखरच राजकुमार केकाटे यांचे हे कोरोना कार्य करुणे सारखे आहे.
तसे पाहता लढवय्या व्यक्तिमत्त्व म्हणून राजकुमार केकाटे यांची ओळख….. खेड्या पाड्यातील अनेकांचे शासकीय कार्यालयात अनेक प्रश्न घेऊन जाऊन ते मार्ग लावणे असो किंवा निवेदन,आंदोलन,मोर्चे व निषेध असे अनेक कार्य करून सतत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत सतत दीनदूबळ्याची सेवा करुन राहून दिनदुबळ्यांचे कामे मार्गी लावतात…
असे या सच्चा राष्ट्रवादी भक्ताची कंधार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पदस्विकारून दोन वर्षे झाल्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याची पावती मिळावी म्हणून आज दोन शब्द लिहण्याचा प्रयत्न केला..
अशा या नेत्यांकडून अनेक कामे होत असतात अशी कामे पुढील व्हावी या अपेक्षासह……
पुनश्च एकदा माझ्या नेत्यास शहराध्य म्हणून यशस्वीपणे दोन वर्षाची कारकिर्द चालवत आपले शहराध्य पद संभाळत कार्य चालवले व चालवत राहतील यासाठी अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा….
शब्दांकन : – संतोष कागणे
राष्ट्रवादी युवक
काँग्रेस सरचिटणीस कंधार