लोहा कंधारच्या आधुनिक विकासाचा भगीरथ :आमदार श्यामसुंदर शिंदे

 

या देशात पाणीटंचाईपेक्षा पडलेल्या पाण्याचे वाहून जाणारे पाणी आडवीने आणि त्याच भागातील जमिनीत जिरवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे, याची जाणीव असणारे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली, युती आणि महाविकास आघाडी दोन्ही सरकारच्या काळात त्यांनी या भागातील जलसिंचनासाठी आणि पाण्याचे नियोजनासाठी सातत्याने प्रयत्न केले, एवढेच नाही तर दोन्ही तालुक्यात असलेल्या साठवण तलावाचे पुनर्जीवन करून काही नवीन तलावांना मंजुरी मिळून घेतली, खऱ्या अर्थाने टँकर मुक्ती करणारे आमदार शिंदे जलपुत्र म्हणून गौरविले जातात.

कोणत्याही भागाचा सर्वांगीण विकासाची मूर्तमेढ रोवण्यासाठी आणि त्या-त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या-त्या भागाच्या नेतृत्वामध्ये जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असते. किंबहुना जाणीव असून भागत नाही तर ती जबाबदारी पार पाडण्याची कुवत, क्षमता, परिपक्वता आणि दुरदृष्टिकोन हवा असतो. या सर्व बाबी एकत्रित आल्यानंतर निश्चितपणे त्या भागात सर्वांगीण विकास होतो हे सर्वश्रुत आहे. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघासाठीही दूरदृष्टीकोणाचा, प्रचंड क्षमतेचा, परिपक्वतेचा आणि उच्च शिक्षित आणि भारतीय प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ सेवा दिलेल्या, माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे लोहा कंधार मतदारसंघाल आमदार मिळाल्याने या भागाच्या विकासाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात केले साठ वर्षात विकासासाठी जो निधी उपलब्ध झाला नव्हता, तो निधी कोरोना चार गंभीर काळ वगळता अवघ्या अवघ्या दोन वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी उपलब्ध करून दिला आहे. उजाड माळरानावरती विकासाची बाग फुलविणारा एक समृद्ध वारसा घेऊन आमदार श्यामसुंदर शिंदे काम करत आहेत. अनेक भागात केवळ एक लोकप्रतिनिधी काम करतो, मात्र लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी आ. शिंदे कुटुंबिय सदैव हजर आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापूर्वीचा आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा शासकीय सेवेतील कालावधी जरी पाहिला तरी तो लोककल्याणाचा, सामाजिक उत्थानाचा एक इतिहास आहे. आपल्या समाजातील गोरगरीब जनतेतील युवक-युवतींना शासकीय सेवेत नोकरी मिळावी यासाठी उभे आयुष्य तळमळ करणारा आणि त्याच तळमळीने, तगमगिने बेरोजगारांना मदत करणारे देवदूत म्हणून श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या कुटुंबातील दारिद्र्य पाहिलेले आणि अनेक संकटे यातून स्वतः मार्ग काढत सनदी अधिकारी म्हणून श्यामसुंदर शिंदे यांनी निर्माण केलेला स्वतःच्या नावाचा अमिट असा ठसा अनेकांची प्रेरणा आहे. एखादा व्यक्ती अधिकारी झाल्यानंतर तो फक्त आपण, आपले कुटुंब या एवढा पुरताच मर्यातदित राहतो. वैयक्तिक सुख-सुविधा मिळवण्यासाठी त्यांची तळमळ असते तगमग असते. त्यासाठी त्यांचा प्रयत्नही असतो परंतु या सर्व बाबींना आमदार श्यामसुंदर शिंदे अपवाद ठरतात. स्वतः नोकरीला लागल्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखाचे दिवस बघता यावेत त्यांना पोटभर जेवण मिळावे, अंगभर कपडे मिळावेत, किमान मध्यमवर्गीयांचे जीवन त्याला सन्मानाने जगता यावे यासाठी बांधणी केली. सुशिक्षित तरुण-तरुणींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. गावातील अनेक गोरगरिबांच्या मुलींचे विवाह लावून देतानाही स्वतःच्या पोटच्या पोरीच्या लग्नाच्या आनंदाप्रमाणे त्यांनी आनंद अनुभवला ही माया ममता जपत असतानाच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील माळरानात माणुसकीचा झरा झिरपू लागला तो शिंदे कुटुंबीयांच्या आपुलकीने.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सनदी अधिकारी म्हणून सर्व दूरपरिचित असणाऱ्या दानशूर श्यामसुंदर शिंदे यांच्या मतदानाच्या मतयंत्रणात लाखो मतदारांनी आपला नेता म्हणून मतदान केले. श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर सर्वप्रथम मतदारांना नतमस्तक होऊन अभिवादन केले आणि ही खऱ्या लोकप्रतिनिधीची ओळख आहे. या मतदारसंघात पूर्वी विकासाच्या नावाखाली, निधीच्या नावाखाली जे गैरव्यवहार झाले, जे भ्रष्टाचार झाले, जी हुकुमशाही झाली, जी घराणेशाही झाली त्या सर्व बाबींना बाजूला टाकत जनतेच्या हितासाठीचे राजकारण सुरू झाले ते आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या रूपाने. या मतदारसंघात निधी खेचून आणताना जात, धर्म, वंश, राजकीय पक्ष या कोणत्याही बाबींना महत्त्व न देता केवळ माझ्या मतदारसंघातील जनता हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी उचललेला लोक कल्याणाचा विडा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा समाजसेविका ममता सागर सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे आणि शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस तथा युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे ही तितक्याच पोट तिडकेने पुढे नेत आहेत.
या मतदार संघात कधी नव्हे इतका निधी उपलब्ध झाला तो आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या कार्यकर्तुत्वामुळे, ही कामे करत असताना या भागात जलसिंचनाची कामे व्हावी त्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त टँकरचा तालुका म्हणून लोहा कंधार तालुक्याची ओळख होती, दरवर्षी उन्हाळ्यात या तालुक्यांमध्ये किमान शे दीडशे टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. वाडी-तांड्यांवर एक हंडा पाणी मिळवण्यासाठी त्या गावातील नागरिकांची होणारी होरपळ आणि पायपीट कमालीची होती. घामाच्या धारा जमिनीला स्पर्श करायच्या एक हंडा पाणी मिळवण्यासाठी ,भर दुपारी पाण्यासाठी होणारी बायकांची मरमर थांबली पाहिजे, यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पोट तिडकिने नियोजन केले. याचवेळी स्त्रियांच्या वेदना एक स्त्रीच समजू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई श्यामसुंदर शिंदे. वाडी-तांडा, गाव-शिवार अनेक भागातील बायकांशी संवाद साधत त्यांच्या वेदना समजून घेणाऱ्या या माय माऊलीने ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले. शिंदे दाम्पत्याच्या प्रयत्नामुळेच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात शेकडो टँकरची संख्या बोटावर मोजणे इतकी कमी झाली. अर्थात यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला केवळ टँकर बंद होऊन भागणार नाही तर या भागातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले पाहिजे, जोपर्यंत शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत होणार नाही अशी रास्त धारणा असणाऱ्या आणि तितक्याच चिकित्सक अभ्यास असणाऱ्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात 23 साठवण तलाव मंजूर करून घेण्याचा सपाटा सुरू केला. अनेक तलावांचे पुनर्जीवन केले, अनेक तलावातील गाळ उपसण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, तर काही ठिकाणी नवीन तलावांना मंजुरी मिळवून घेतली. राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबवित तलाव बांधकामासाठी त्यांना मिळालेला निधी नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक निधी ठरतो आहे. लोहा-कंधार मतदार संघातील गुंडा-उंमरा साठवण तलाव 20 दलघमी पाणी साठवण करणारे या तलावासाठी 02 कोटी 62 लाख रुपये मंजूर करण्यात आले, या सिंचन तलावातून 2800 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. हिंदोळा तलावासाठी 65 कोटी 05 लाख रुपये मंजूर केले, पाच दलघमी क्षमता असणारे या तलावातून 700 हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. मलकापूर साठवून तलावासाठी 65 कोटी 05 लाख रुपये मंजूर करण्यात आले त्यातून 700 हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. दहीकळंबा साठवून तलावातून 600 हेक्टरचे जलसिंचन होणार असून त्यासाठी 39 कोटी 03 लाख रुपये मंजूर करण्यात आले. पाच दलघमी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 65 कोटी 05 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, यातून 700 हेक्टर सिंचन होणार आहे. जानापुरी साठवण तलावासाठी 65 कोटी 05 लाख रुपये मंजूर करण्यात आले, या तलावातून १००० हेक्टर वर सिंचन करण्यात येणार आहे. शेलगाव साठवण तलावातून 2400 हेक्टरवर जलसिंचन करण्यात येणार असून यासाठी 157 कोटी 02 लाख रुपये यांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. साठवण तलावासाठी 37 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले, असून या तलावातून 398 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. करमाळा साठवून तलावासाठी 13 कोटी 01 लाख रुपये मंजूर करण्यात आले, या तलावातून 140 हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. पिंपळदरी साठवून तलावासाठी 06 कोटी ५५ लाख रुपये, कापशी तलावासाठी 13 कोटी रुपये, जोमेगाव तलावासाठी 06 कोटी ५५ लाख रुपये, येळी साठवन तलावासाठी 13 कोटी 01 लाख रुपये, नांदगाव साठवून तलावासाठी 26 कोटी 02 लाख रुपये ,मारतळा साठवन तलावासाठी 13 कोटी 01 लाख रुपये, नगारवाडी साठवन तलावासाठी 13 कोटी, देऊळगाव साठवण तलावासाठी 26 कोटी 02 लाख रुपये, कामजळगावाडी साठवण26 कोटी, करमाळा २ तलावासाठी 13 कोटी रुपये,सावळेश्वर तलावासाठी 65 कोटी 05 लाख रुपये तर लाठ खु. साठवण तलावासाठी 52 कोटी 04 लाख रुपये,परशुराम तांडा१३.१, हळदा १३.१ असा एकूण 1425 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर आला आहे. १७६६ हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शेकडो गावातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनातील दारिद्र्य कायमचे संपणार आहे. वांज होत असलेल्या कोरडवाहु जमिनीला पुन्हा एकदा घुमारे फुटणार आहेत. खडकाळ माळरानाच्या जमिनीची ओटी भरण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नियोजन केले आहे.
याशिवाय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील विविध भागात विकासासाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिला आहे. लोहा शहरातील आणि कंधार शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे या दोन्ही शहरांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. मागील साठ वर्षात या भागाला खऱ्या अर्थाने विकासाचा चेहरा मिळाला नव्हता तो आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या रूपाने मिळाला आहे. यामुळेच लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाच्या आधुनिक विकासाचा भगीरथ म्हणून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करावा लागेल.

 

1766 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून आतापर्यंत या भागातील दऱ्या-खोऱ्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले नव्हते. त्यामुळेच मन्याडचे खोरे सातत्याने वांजुटे राहिले होते. या भागात अनेकांच्या नेतृत्वाचा विकास झाला मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकासाचा मागमुस लागला नव्हता अशा परिस्थितीत 2019 मध्ये लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून श्यामसुंदर शिंदे विजय झाल्यानंतर या भागात कृषी सिंचनासाठी मोठे प्रयत्न सुरू झाले. अवघ्या चार वर्षाच्या काळात या भागात विविध साठवन तलावांच्या माध्यमातून 1766हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आनण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारा 1425 कोटी रुपयांचा निधी लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे मन्याड खोऱ्यातल्या दऱ्या-खोऱ्यातून आता नव्या हिरव्या स्वर्ग सुखाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

 

.. अशोक सोनकांबळे प्रसिद्धीप्रमुख आमदार श्यामसुंदर शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *