कंधार ; प्रतिनिधी
कोरोनाकाळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भाऊच्या डब्ब्याच्या माध्यमातून अन्न पुरवण्याचे सेवावृत्त अंगी बाळगून आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सुरू केलेल्या भाऊच्या डब्ब्याने नुकताच आठशे दिवसाचा पल्ला गाठला आहे.भाऊच्या डब्ब्याने आठशे दिवसापासून कंधार व लोह्यामध्ये अखंडित सेवेचेवृत जोपासले असून भाऊच्या डब्ब्यातून रुग्णाची व त्यांच्या नातेवाइकांची अविरत सेवा सुरूच राहणार असल्याचे प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सांगितले.
जेष्ठ स्वतंत्र सेनानी, माजी खासदार व माजी आमदार दिवंगत डॉ.केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वाढ दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या संकल्पेतून दि.१ मे २०२१ पासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातलगासाठी सुरू करण्यात आलेल्या भाऊच्या डब्याने आठशे दिवसाचा पल्ला ओलांडला असून कंधार व लोहा तालुक्यातील रुग्णांसाठी “भाऊचा डब्बा” आधारवड बनला आहे.सामाजिक बांधिलकीचा हा वसा असाच अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार यानिमित्ताने प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी व्यक्त केला आहे.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी कंधार व लोहा शहरातील रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना व वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जेवणाची सोय व्हावी म्हणून “भाऊचा डब्बा” हा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. भाऊच्या डब्याने बघता बघता आठशे दिवसाचा टप्पा ओलांडला असून आजही हा उपक्रम अविरतपणे चालु आहे. कंधार, लोहा येथील रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना “भाऊचा डब्बा”आजही पुरविला जात आहे. माजी खासदार व माजी आमदार दिवंगत डॉ.भाई केशवराव धोडगे यांनी आपल्या हयातीत गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी व हितासाठी अहोरात्र प्रयत्न करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य त्यांचे सुपूत्र प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे करीत असून त्यांनी गोरगरीब जनतेसाठी “भाऊचा डब्बा”हा उपक्रम चालू केला आहे.
कोरोना काळात प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी सर्व प्रथम कंधार व लोहा येथील खाजगी व सरकारी सेवेतील डॉक्टर,नर्स व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व पी.पी.ई.किटचे वाटप केले.
लोहा व कंधार तालुक्यातील ज्या पाल्यांचे पालकत्व कोरोणामुळे हिरावले गेले अशा पाल्यांच्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी स्विकारुन “जिथे कमी तिथे आम्ही” हे सिद्ध केले. प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांचा नेहमी सामाजिक बांधिलकीत पुढाकार असतो. गरजू विद्यार्थी, गोरगरिबांसाठी ते अग्रेसर असतात. हरित कंधार या उपक्रमात सुद्धा ते हिरीरीने सहभागी होतात. भाऊचा डब्बा कंधार-लोह्यातील रुग्णासाठी मैलाचा दगड बनला असून अविरत सेवेचे हे वृत्त दोन्ही तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.