एखाद्या दाम्पत्याचे अपत्यप्राप्तीसाठी किंवा अपत्य जगत नसेल तर खंडोबा देवतेस मुलगा जगला तर तुला अर्पण करेल! खरच तो जगला तर वाघ्या म्हणून खंडोबा देवतानामे सोडतो,अन् मुलगी झाल्यास तीला देवतेस अर्पण करताच ती मुरळी बनते.दोघांनाही अर्पण करतांना विवक्षित दीक्षाविधी असतो.वाघ्या बनतांना त्या मुलाचे पिता आपला संकल्प प्रथम चैत्र महिन्यात गुरवाला कळवातो.त्या नियोजित वाघ्याला वाजत-गाजत खंडोबा मंदिरात मिरवणूकीने आणुन गुरव त्यांच्या अंगावर बेलभंडार उधळतो.आणि वाघाच्या चामडी पिशवीत भंडारा भरुन ती पिशवी त्या वाघ्याच्या गळ्यात अडकवतो.त्या वाघ्यास स्विकारण्याची विनंती खंडोबाकडे करतो.
मुरळीचे लग्न श्री खंडोबा देवतेसंग लावतात.हा विवाह चैत्र मासात लावला जातो.प्रथम खंडोबाला व मुरळीला हळद भंडार लावला जातो.मुरळीला साज श्रृंगार करुन तयार केले जाते.नंतर देवतेचे पुजन करुन मुरळीस ९ कवड्यांची माळ उपाध्याय करवी गळ्यात माळ घालतांना गाठ्या फोडणे म्हटल्या जाते.येळकोट घे।येळकोट घे॥ असो दोनदा गजर करुन मुरळी खंडोबास अर्पण केली जाते.वाघ्या अन् मुरळी खंडेरायाचे गाणी म्हणत नृत्य करतांना भिक्षा मागतात.ऐळ आमवस्यला खंडेरायाच्या यात्रे मध्ये वाघ्या-मुरळचे लोकनृत्य सामाजिक आभ्यासकांच्या नजरेस पडते.
दक्षिण भारतातील मोठी श्री खंडेरायांच्या यात्रेमध्ये वाघ्या मुरळीची गाणी आणि लोकनृत्य पहायला मिळते.वाघ्याच्या हातात खंजीरी व तुणतुणे आणि मुरळीच्या हातात घोळ वाद्य वाजतांना सुंदर लोकनृत्य केले जाते.अनेक ठिकाणी जागरणासम जागरण केले जाते.
(दत्तात्रय एमेकर , सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार)