शेतकऱ्यांसह गोरगरीब सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव सज्ज – अनिल मोरे

लोहयात काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार पुढाकाराने काँग्रेसची केंद्र सरकारने शेतकरी विधेयक मागे घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू

लोहा / प्रतिनिधी


शेतकऱ्यांना गोरगरिबांना सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसने सज्ज राहिले पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल मोरे यांनी लोहा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम बैठकीत केले.


भाजप प्रणित केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी कृषी व कामगार विधेयक संसदेमध्ये मंजूर करून घेतले त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा खा. सोनीया गांधी ,खा.राहूल गांधी यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभर स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून प्रदेश काँग्रेस यांच्या आदेशानुसार नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम बैठकीचे आयोजन आज दिनांक १७ रोजी लोहा शहर काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पवार यांच्या पुढाकाराने सुरु केले असून यासंदर्भात लोहा शहर काँग्रेसच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेस नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल मोरे, होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून काँग्रेसचे लोहा शहराध्यक्ष वसंत पवार, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, काँग्रेसचे लोहा तालुका उपाध्यक्ष किशनराव पाटील लोंढे, काँग्रेसचे लोहा लोहा न.पा.चे गटनेते पंचशील कांबळे, माजी बांधकाम सभापती पंकज परिहार, युवक काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस बाबासाहेब बाबर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.गवळी, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, अनिल दाढेल, शेख शरफोदीन, भूषण दमकोंडवार, माजी सरपंच आर.आर. पाटील, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पांडूरंग शेटे ,बालाजी जाधव,आदी उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना काँग्रेस नेते अनिल मोरे म्हणाले की,हे विधेयक केंद्र सरकारने वाजवी बहुमताने पारित केले आहे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला संसद सदस्याला बोलू दिले नाही . धक्काबुक्की करण्यात आली. केंद्र सरकार हे शेतकरी सामान्य माणूस गोरगरीब व बहुजनांच्या विरोधात आहे . उद्योगपती धार्जिणे आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने देशभरातून पन्नास कोटी शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सह्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी हे दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपतीला भेटून निवेदन देणार आहेत.


तेव्हा लोहा शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्याने काँग्रेसचे ध्येयधोरणे नागरिकांना पटवून सांगावे केंद्र सरकार हे शेतकरी कामगार विरोधी आहे हे पटवून सांगावे व लोहा शहरातील प्रत्येक वॉर्डातून व लोहा तालुक्यातील 118 गावातून प्रत्येक प्रत्येकाकडून स्वाक्षरी घेऊन लोहा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने किमान पन्नास हजार सह्या दि. 25 ऑक्टोंबर पर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीकडे द्याव्या असे आव्हान काँग्रेस नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *