
Highlight News
Features and Events
घागरदरा येथिल गोशाळेत २५० गायीचे संवर्धन;मठाधिपती श्री संत एकनाथ महाराज यांची माहीती
कंधार ;दिगांबर वाघमारे मिनी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नामदेव महाराज मठसंस्थान उमरज मार्फत शंभू कडा महादेव घागरदरा येथील मंदिर परिसरात गाईंचे गेली पन्नास वर्षापासून संवर्धन करण्यात येते. आज घडीला या गोसंवर्धन केंद्र मध्ये तब्बल २५० गाई तर तीन वळूंचा समावेश असून हा सर्व खर्च उमरज संस्थानाच्या माध्यमातून केला जातो. […]
महाराष्ट्रात शाळा-कॉलेज उघडण्यासारखी स्थिती नाही – ना. उदय सामंत
पुणे ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आढावा बैठकीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारने शाळा, महाविद्यालये १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. मात्र, राज्याची परिस्थिती वेगळी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय सुरू होणार नाहीत, अशी माहिती […]
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा पुणे ; पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा […]
नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे 8 व्यक्तींचा मृत्यू, 180 कोरोना बाधितांची भर.
नांदेड ; मंगळवार 6 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 205 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 180 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 59 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 121 बाधित आले. आजच्या एकुण 829 अहवालापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 […]
रस्त्यावरचा हॅप्पीवाला बर्थ डे
आजकाल तरुणाईमध्ये रस्त्यावरच वाढदिवस साजरा करण्याचे फॅड आले आहे. असा वाढदिवस साजरा करताना दहा बारा जणांचे टोळके रस्त्यावरच्याच छोट्या मोठ्या किंवा मोठ्यात मोठ्या दुकानातून आवश्यकतेनुसार केक खरेदी करायचा आणि आपल्या गल्ली, नगरात किंवा जिथे सोयिस्कर होईल तिथे रस्त्यावरच गाड्या उभ्या करुन हॅप्पीवाला बर्थ डे साजरा केला जातो. घरदार सोडून सर्व मित्र मैत्रीणीना […]
विजय चव्हाण यांनी कंधार तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला
कंधार : सय्यद हबीब कंधारचे तहसीलदार सखाराम मांडावगडे यांची जिंतूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे विजय चव्हाण यांनी प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.६ अॉक्टोबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कंधार शहरातील सामान्यातल्या सामान्य नागरिकाला न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचा मनोदय विजय चव्हाण यांनी व्यक्त केला […]
खासदार प्रताप पाटील चिखलीकर कोणाच्याही कामाचे श्रेय घेण्यात पटाईत — मा.आ.शंकर अण्णा धोंडगे
देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना अरोग्य केंद्रास मजुरी का मिळाली नाही—शंकर अण्णा धोंडगे यांचा चिखलीकर यांना सवाल कंधार ;मो.सिकंदर लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत असताना तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून या मतदारसंघात नव्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर सहा उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असल्याचा दावा खासदार प्रताप […]
नांदेड शहर गोळीबार प्रकरणातील चार आरोपी ताब्यात, दोन फरार;पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची माहिती.
नांदेड ; नांदेड शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या जुना मोंढा या ठिकाणी गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या सहा पैकी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली. रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास जुना मोंढा भागातील तारासिंग मार्केटमधील दुकानदारांना गुंडांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार करून लुटण्याची […]
आश्विन पौर्णिमेनिमित्त डॉ. आंबेडकर नगरात विविध कार्यक्रम
नांदेड – ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित काव्यपौर्णिमा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंधरा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वर्षातील एकूण सहा काव्यपौर्णिमा आॅनलाईन घेण्यात आल्यानंतर सातवी काव्यपौर्णिमा प्रत्यक्ष बुद्ध विहारात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करुन व खबरदारी घेऊन साजरी करण्यात आली. […]
शिक्षक सेना नांदेडच्या ऑनलाईन सभासद नोंदणीस प्रारंभ!
नांदेड – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेची ऑनलाईन गुगल मीट आढावा बैठक व आॅनलाईन सभासद नोंदणी लिंकचे उदघाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. डाॅ. गोविंद काळे (मराठवाडा अध्यक्ष ) तर प्रमुख उपस्थिती सन्माननीय राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष ज.मो .अभ्यंकर साहेब (राज्यमंत्री दर्जा ) आॅनलाइन गुगल […]
शिवराज्य संघटनेच्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी भाऊसाहेब पा.चव्हाण तर उपाध्यक्ष पदी शिवाजी पा. शिंदे यांची निवड
नायगाव प्रतिनिधी : शिवराज्य संघटनेची नायगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नायगाव तालुका कार्यकारणी स्वराज्य युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जाहीर केली आहे नायगाव तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब पाटील चव्हाण तर उपाध्यक्षपदी शिवाजी पाटील शिंदे यांची या बैठकीत निवड करून त्यांना नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात […]
मुंबई उपनगरात लवकरचं गृहनिर्माण; सम्यक मैत्रेय फौंडेशन चा पाठपुरावा
मुंबई ; (प्रतिनिधी) येथील वेगवेगळ्या उपनगरात अल्पदरामध्ये गृहनिर्माणसाठी मागील काही वर्षापासून सम्यक मैत्रेय फाउंडेशन या एनजीओ च्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे, जमीन हस्तांतरण प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार आहे.अशी माहिती प्रसिद्धि पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, मुलुंड व दहिसर परिसरातील सरकारी जमिनीवर गृहनिर्माण करण्यासाठी मागील काही वर्षांपासून […]